माजी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनाला अपघात : दोघांचा मृत्यू ?

चंद्रपूर : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाला चंद्रपुरहुन नागपूर जाताना गुरुवारी सकाळी अपघात झाला. या अपघातातून अहिर थोडक्यात बचावले, मात्र वाहनातील दोघांचा मृत्यू झाल्याचे समजते मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अहिर हे चंद्रपूरहून निघाले असताना चंद्रपूर-नागपूर महामार्गाहून पुढे जाताना तांडळी पूल पार केल्यानंतर अहिर यांच्या मागच्या ताफ्यातील वाहनाला कंटेनरला धडक बसली. या धडकेत विनोद झाडे (पोलिस) आणि फलजीभाई पटेल (सीआरपीएफ) जवान या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच तीन जवान गंभीर जखमी झाले असून त्यांना नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

