जळगावात हातमजुराची आत्महत्या
जळगाव : कुटुंबीय कामासाठी गेले असतांना हातमजुर किशोर ज्ञानेश्वर कोळी (30, रा.वाल्मिकनगर) या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. वाल्मिक नगरात किशोर हा वडील ज्ञानेश्वर आत्माराम कोळी, आई शोभा, भाऊ रविंद्र यांच्यासोबत वास्तव्यास होता. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे आई, वडील, भाऊ घराबाहेर पडले. मात्र किशोर हा कामावर गेला नाही. वडील दुपारी चारवाजेच्या सुमारास घरी परत आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात डोकावले असता मुलगा किशोरन साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी टाहो फोडा. शनिपेठ पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला. यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.