चोरीचे साहित्य घेणार्या अमरावतीच्या भामट्यास बेड्या
अमरावतीच्या अल्पवयीन मुलांनी भुसावळातील एलआयसी एजंटांची प्रार्थनास्थळातून लांबवली होती बॅग ः जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी
जळगाव : भुसाळातील रहिवासी व एलआयसी एजंट अन्सारी निसार शाह (35, रा.ग्रीन पार्क, आशादिप बिल्डींग जवळ, खडका रोड, भुसावळ) हे शुक्रवारी दुपारी दिड वाजता पाणीगेट मशिदीत नमाज पठाणाला गेल्यानंतर त्यांनी कामकाजाची बॅग अजान देत असलेल्या ठिकाणी ठेवली मात्र काही वेळात ती चोरीला गेल्याने शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमरावतील काही संशयीत मुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चोरीचे साहित्य अमरावतीतील एक जण घेत असल्याची माहिती दिल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली. निहाल उर्फ फरहान शेख आरीफ (19, रा.कमेला ग्राऊंड, आसुरीया पेट्रोल पंपजवळ, अमरावती) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
यांनी केली कारवाई
हीकारवाई पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहा.पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या नेतृत्वात एएसआय राजेंद्र का.पाटील, अशोक महाजन, कमलाकर बागुल,किशोर राठोड, विनोद सुभाष पाटील, अरुण राजपुत, रणजित जाधव यांना अमरावती येथे तसेच पोहेकॉ . विजय पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे आदींच्या पथकाने केली. आरोपीला भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.