गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक
सोलापूर : विधान परीषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर सोलापुरात अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याने वाहनाच्या काचा फुटल्या तर पडळकर बचावले. घोंगडी बैठक घेण्यासाठी गेले असता अज्ञात व्यक्तीनं पडळकरांच्या गाडीवर दगडानं हल्ला केल्याची घटना घडली.
गोळ्या जरी घातल्या, तरी माघार नाही
घोंगडी बैठक संपल्यानंतर मी गाडीत बसलो. गाडी सुरु करुन थोडं पुढे आल्यावर ही दगडफेक झाली. मी पाहिलं तेव्हा 4 ते 5 लोक होते. मात्र, अंधारात किती लोक असतील मला माहिती नाही, असं पडळकर म्हणाले आहेत. राज्यात आम्ही लोकशाही मानतो, आम्ही सुसंस्कृत आहोत, आम्हाला लोकांची काळजी आहे अशा वावड्या उठवतात त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. माझा आवाज बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, तर तो असा बंद होणार नाही. उद्या गोळ्या जरी घातल्या, तरी मी माघार घेणार नाही, असेही ते म्हणाले.




