शिखर बँकेच्या घोटाळ्याशी शरद पवारांचा काडीमात्र संबंध नाही
अजित पवार यांनी केली पत्रकार परीषदेत पाठराखण
मुंबई : शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवारांवर गुन्हा दाखल केला असून ते बँकेचे संचालक नसतानाही गुन्हा दाखल करण्यात आल्याची बाब ही दुर्दैवी आहे कदाचित माझ्याशी त्यांचा संबंध असल्यानेच त्यांना गोवण्यात आले असावे, असा दावा अजित पवार यांनी पत्रकार परीषदेत केला. सतत साहेबांचे नाव येत असल्याने आपण व्यथित झालो म्हणून आपण राजीनामा दिल्याचेही पवार म्हणाले.
- अजित पवार यांच्या पत्रकार परीषदेतील मुद्दे
- ईडीने गुन्हा दाखल केल्याने राजीनामा दिला
- बारामतीच्या पुरामुळे मुंबईत गैरहजर राहिलो
- सतत साहेबांचे नाव येत असल्याने व्यथित झालो
- शरद पवारांचा शब्द कुटुंबात अंतिम
- पवार कुटुंबात गृहकलम नाही
- राजीनामा दिल्याची चूक केली की नाही माहिती नाही
- पत्रकार परीषदेत अजित पवारांना अश्रू अनावर
- आमच्या परीवारातून अनेक जण निघून गेल्याचे दुःख, वेदना आहेत
- आम्ही कुठेतरी कमी पडल्याने ते आम्हाला सोडून गेले
- शरद पवारांच्या नजरेला नजर मिळवू शकलो नाही
- पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांची माफी मागतो
(अपडेट बातमी पाहण्यासाठी लिंक रीफ्रेश करत रहा)