नंदुरबारच्या नव्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री
धुळे जिल्हाधिकारीपदी जलज शर्मा : आयएएस अधिकार्यांच्या बदल्या
मुंबई : नंदुरबार जिल्हाधिकारीपदीा नगपूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची तर धुळे जिल्हाधिकारीपदी नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. शुक्रवारी राज्यातील आयएएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. दरम्यान, धुळ्याचे विद्यमान जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या नियुक्तीचे ठिकाण अद्याप स्पष्ट झाले नसून नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांची पुणे येथील आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे.
