भुसावळच्या युवकाचा हरताळा फाट्यावर अपघाती मृत्यू
आगाखान वाड्यात शोककळा : भरधाव टँकरने दिली दुचाकीला धडक
मुक्ताईनगर : भरधाव टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत भुसावळातील आगाखान वाड्यातील रहिवासी असलेल्या युवकाचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा अपघात आशिया महामार्ग क्रमांक 46 व हरताळा फाट्याजवळ झाला. शेख आसीफ शेख हनीफ (19, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. या तरुणाच्या मृत्यूने भुसावळातील आगाखान वाड्यात शोककळा पसरली.
भरधाव टँकर दुचाकीवर आदळला
शेख अकील शेख मोहम्मद (भुसावळ) यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आशिया महामार्ग 46 वर हरताळा फाट्याजवळ टँकर (क्रमांक एम.एच.40-0269) ने समोरून येणार्या दुचाकी (क्रमांक एम.एच.19- 238) या पल्सरला जोरदार धडक दिल्याने शेख आसीफ या तरुणाचा मृत्यू झाला. टँकर चालक राजू गोपाळराव वानखेडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रावण जवरे करीत आहेत.