बिग ब्रेकींग : सिंदीदिगर घाटात क्रुझर कोसळल्याने आठ प्रवासी ठार
400 फूट दरीत कोसळले वाहन : दहा प्रवासी जखमी तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती
धडगाव : प्रवासी वाहून नेणार्या क्रुझर वाहन सुमारे 400 फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असून दहावर प्रवासी जखमी झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. रविवार, 18 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तालुक्यातील तोरणमाळ परीसरातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भाग असलेल्या सिंदिदिगर घाटात हा अपघात झाला. तोरणमाळ येथून खडकी-सिंदिदीगर मार्गाने मध्यप्रदेशातील सेम्लेट, चेरवी, ता.पाटी, जि.बडवानी येथे हे प्रवासी वाहन जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तोरणमाळ येथे उपचारार्थ हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अवैध वाहतूक पुन्हा ऐरणीवर
जानेवारी महिन्यात तोरणमाळ ते खडकी दरम्यान असाच भीषण अपघात झाल्याने त्यावेळीदेखील अवैध वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता शिवाय रविवारीदेखील झालेल्या भीषण अपघातामुळे पुन्हा अवैध वाहतूक ऐरणीवर आली आहे. दरम्यान, अपघातस्थळ मोबाईल कव्हरेज क्षेत्राबाहेर आणि खडतर असल्याने या ठिकाणी मदतकार्य करण्यास अनेक अडथळे निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.





