श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर पाटील यांचे निधन
शेगाव : श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील (82) यांचे बुधवार, 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता वृध्दापकाळामुळे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती अस्थिर झाल्याने घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते व बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाने बुलडाणासह विदर्भा व संपूर्ण महाराष्ट्रातील धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातून तसेच भाविकांमधून शोकसंवेदना व्यक्त होत आहे.
‘सेवा’ हाच भाऊसाहेबांचा धर्म
भाऊसाहेब म्हणून परीचीत असलेल्या शिवशंकरभाऊ पाटील यांनी उभी हयात सेवा धर्म जोपासला. शेगावातील श्री गजानन महाराज मंदिर परीसरात विविध सुविधा त्यांच्या कार्यकाळात निर्माण करण्यात आल्या. धार्मिक आणि अध्यात्मिकतेच्या पायावर उल्लेखनीय सेवा कार्य आणि विकासकार्य करणारे शिवशंकरभाऊ पाटील यांच्या शिस्त, सचोटी, स्वच्छता आणि पारदर्शक कारभारामुळे देशभरात श्री गजानन महाराज संस्थानची ख्याती निर्माण झाली.




