नंदुरबार शहरात अनेाळखी महिलेचा खून
नंदुरबार : नंदुरबार शहरातील बिलाडी रस्त्यावर गुरुवार, 26 रोजी छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आलेल्या अनोळखी महिलेचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अनोळखी महिलेची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. महिलेची ओळख पटविण्यासह मारेकर्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे ठाकले आहे. 22 ते 30 वर्ष वयोगटाच्या पंजाबी ड्रेसमधील या महिलेचा मृतदेह रेल्वेमार्गालगत शिर व धड अलग अशा अवस्थेत आढळला होता. मृतदेहावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मारेकर्यासह अज्ञात महिलेची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
