भुसावळात मधमाशांच्या हल्ल्यात वयोवृद्धाचा मृत्यू


भुसावळ : शहरातील आरपीडी रस्त्यावरील आंबेडकर उद्यानाजवळ मधमाशांनी हल्ला चढवल्याने भगवान हरचंद तायडे (67, झेडटीएस, भुसावळ) यांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिसात मुकेश मधुकर साळुंके (34, झेडटीएस, भुसावळ) यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, समजलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या झेडटीआरआय विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी तायडे हे रीक्षाने शहराकडे येत असतानाच अचानक मधमाशांनी हल्ला चढवला व या हल्ल्यानंतर चालकाने रीक्षा थांबवली तर अन्य प्रवासीही सैरावैरा पळाले मात्र तायडे यांना पळता न आल्याने मधमाशांनी त्यांच्या चेहर्‍यासह शरीरावर दंश केल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. तायडे यांच्या ओळखीतील सदगृहस्थाने कुटुंबियांना माहिती दिल्यानंतर त्यांनी धाव घेतली. सायंकाळी मृतदेह जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !