बोरीवलीत साडेसात कोटींचा ऐवज जप्त : रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई


मुंबई : बोरीवली रेल्वे पोलिसांनी तब्बल साडे सात कोटींचा ऐवज जप्त केला असून यंदाच्या निवडणूक हंगामात राज्यातील ही सर्वाधिक मोठी कारवाई मानली जात आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांतून गुजरात एक्स्प्रेसमधून अनधिकृतपणे कोट्यवधींची रक्कम नेण्यात येणार असल्याची माहिती बोरीवली रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक भास्कर पवार यांनी मंगळवारी रात्री बोरीवली स्थानकात सापळा रचला. यावेळी गुजरात मेलमधील डब्यांची तपासणीत तब्बल 35 बॅगा भरुन कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. यात 10 लाखांच्या रोख रकमेसह हिर्‍यांचे हार, सोन्याचे दागिन्यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !