संतापजनक : दाम्पत्याला मारहाण करीत विवाहितेवर सामूहिक अत्याचार


गुंटूर : टोळक्याने लग्नाहून परतणार्‍या दाम्पत्याला अडवत बेदम मारहाण केली व नंतर त्यांच्याकडील ऐवज लुटून पतीसमोर विवाहितेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली. सध्या या दाम्पत्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी रात्री 9.30 च्या सुमारास घडली.

संशयीतांची धरपकड : निष्काळजीपणा करणार्‍या पोलिसांवर टिका
लग्न समारंभातून एक दाम्पत्य घरी परतत असताना लुटारूंनी त्यांची दुचाकी पलाडुगु चौकाजवळ अडवली. लुटारूंनी दाम्पत्याला मारहाण करीत त्यांच्याकडील पैसे आणि सोनं लुटले तसेच विवाहितेला नजीकच्या शेतात नेत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. घटनेनंतर रात्री दाम्पत्य तक्रार नोंदवण्यासाठी सत्तेनापल्ली येथील पोलीस ठाण्यात पोहचले परंतु हा गुन्हा आमच्या हद्दीत घडला नसून तुम्हाला मेडिकोंडरु पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा, असे सांगितल्यानंतर दाम्पत्य संबंधित पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवून जखमी अवस्थेतील दाम्पत्याला गुंटूरच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. या घटनेनं राज्यात संतापाची लाट उसळली आहे. घटनेचा निषेध करत विरोधी पक्ष टीडीपीचे राष्ट्रीय महासचिव नारा लोकेश यांनी गुन्हे क्षेत्राची हद्द पाहून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास निष्काळजीपणा करणार्‍या दोषी पोलिसांना निलंबित करा, असा आदेश दिला आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !