धम्मचक्र परीवर्तन दिनानिमित्त 23 गाड्यांना अजनीला थांबा


भुसावळ :  मंगळवार, 8 रोजी असलेल्या धम्म परीवर्तन दिनानिमित्त भाविकांची नागपूरला जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून अजनी रेल्वे स्थानकावर 10 सुपरफास्ट गाड्यांना एक मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे. भाविकांनी या गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या गाड्यांना मिळाला थांबा
अजनी रेल्वे स्थानकावर डाऊन मार्गावरील थांबणार्‍या गाड्यांमध्ये (12101) लोकमान्य टिळक टर्मीनस – हावडा एक्स्प्रेस, पुणे – हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, अमदाबाद नागपूर प्रेरणा एक्स्प्रेस, मुंबई हावडा मेल, अहमदाबाद पुरी एक्स्प्रेस, भुसावळ निजामुद्दिन गोंडवाना एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मीनस विशाखापट्टनम एक्स्प्रेस, मुंबई हावडा गितांजली एक्स्प्रेस, अमरावती जबलपूर एक्स्प्रेस, सूरत पुरी एक्स्प्रेस या डाऊन मार्गावरील तर अप मार्गावरील गाड्या मंगळवार, बुधवारी (8 व 9 ऑक्टोबर) थांबणार आहे, यात जबलपूर अमरावती एक्स्प्रेस, हावडा मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, हटिया पुणे एक्स्प्रेस, हावडा मुंबई मेल, पुरी गांधीधाम एक्स्प्रेस, हावडा पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस, हावडा लोकमान्य टिळक टर्मीनस एक्स्प्रेस, पुरी अजमेर एक्स्प्रेस, पुरी – लोकमान्य टिळक टर्मीनस एक्स्प्रेस, नागपूर अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस, पुरी अहमदाबाद एक्स्प्रेस, हावडा पोरबंदर एक्स्प्रेस, भुवनेश्वर लोकमान्य टिळक टर्मीनस एक्स्प्रेस या गाड्या अजनी स्थानकावर एक मिनीटासाठी थांबणार आहे. प्रवाशांनी आणि नागपूरला धम्म चक्र परिवर्तन दिनानिमीत्त जाणार्‍या भाविकांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाद्वारे केले आहे.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !