निर्णय अमान्य : अपक्ष किल्ला लढवणार -सतीश घुले


भुसावळ : माजी आमदार संतोष चौधरी यांनी घेतलेला निर्णय आपणास अमान्य असून आपण प्रचारात फार पुढे निघून गेल्याने आपण अपक्ष भुसावळचा किल्ला लढवू, अशी माहिती अपक्ष उमेदवार सतीश घुले यांनी रविवारी रात्री उशिरा त्यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परीषदेत दिली. माजी आमदार चौधरींबद्दल आपल्याला आदर असल्याचे त्यांनी सांगितले.

भुसावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ
सुरुवातीला माजी आमदार चौधरींनी राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश घुले असणार असल्याची घोषणा केली मात्र तिकीट वाटपात जागा राष्ट्रवादीतील मित्र पक्ष पीआरपीला गेल्यानंतर भुसावळात खळबळ उडाली. चौधरींनी दुबळ्या उमेदवाराला उमेदवारी मिळाल्याचा आरोप करीत स्वतंत्रपणे चार अपक्षांमधून रविवारी योग्य उमेदवाराची घोषणा करणार असल्याचे सूतोवाच केल्यानंतर त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले होते. चौधरींनी तेली समाज मंगल कार्यालयात रविवारी डॉ.मधू राजेश मानवतकर यांना आपला व कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावेळी घुले यांच्या हस्ते त्यांनी डॉ.मधू मानवतकर यांचा सत्कारही केला. याचवेळी घुले यांनी बाहेर पडत प्रसिद्धी माध्यमांपुढे भूमिका मांडली. आपण प्रचारात फार पुढे गेल्याने आपण आता मागे हटणार नाही व किल्ला लढवू, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !