दरोड्यासह घरफोडीतील पसार संशयीत बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर 2 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास प्रवाशांना लुटण्याच्या प्रयत्न झाल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तब्बल नऊ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणार्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. गोलू शेख शरीफ (19, दीनदयाल, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, हा गुन्हा घडताना चौघांच्या मुसक्या आवळण्यात यश आले होते मात्र गोलू पसार होता.
गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
संशयीत आरोपी रविवारी शिवपूर कन्हाळा रस्त्यावरील घोडेपीर दर्ग्याजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजाजन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख हवालदार सुनील जोशी, रवींद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, किशोर महाजन, अनिल पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींच्या पथकाने केली.