यावल शहरात 8 रोजी रावण दहन कार्यक्रम


यावल : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त मंगळवार, 8 रोजी रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्ज्वल निकम उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, तहसीलदार जितेंद्र कुंवर, यावल पोलिस निरीक्षक रवीकांत सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष मुकेश येवले यांनी कळवली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !