आघाडी म्हणतात, मग राष्ट्रवादीचा एक तरी उमेदवार सोबत आहे का?


माजी आमदार संतोष चौधरींची जगन सोनवणेंवर टिका : खड्ड्यांचा बदला जनता घेणार असल्याची टिका

भुसावळ : पक्षश्रेष्ठींना विचारूनच भुसावळातील उमेदवार जाहीर केला मात्र त्यांनी काही अडचणी असल्याचे त्यांनी सांगून बोलणे टाळणे, पीआरपीच्या गळाला एबी फार्म लागला असलातरी तो फळाला येणार नसल्याची टिका माजी आमदार संतोष चौधरी यांनी करीत राष्ट्रवादीचा एकतरी उमेदवार तुमच्या सोबत आहे का? असा खोचक सवालही त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार जगन सोनवणे यांचे नाव न घेता उपस्थित केला. याप्रसंगी त्यांनी भुसावळातील स्थानिक प्रश्‍नांसह खड्ड्यांवरही सडकून टिका केली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर उमेदवार डॉ.मधू राजेश मानवतकर, त्यांचे पती डॉ.राजेश मानवतकर, माजी नगराध्यक्ष व ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, कृउबा सभापती सचिन चौधरी, गटनेता उल्हास पगारे, ललित मराठे, मयुरी पाटील, नितीन धांडे, बाबूसिंग चितोडीया, पंढरीनाथ पाटील, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, दिलीप सुरवाडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









सोनवणेंचे नाव न घेता केली टिका
राष्ट्रवादीचे उमेदवार जगन सोनवणे यांनी चौधरींचे आपण गुरू असल्याचे पत्रपरीषदेत सांगितल्यानंतर चौधरींनी रात्रीच्या मेळाव्यात त्यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिकेचा आसूड ओढला. खडसेंचे वय झाले म्हणून त्यांना घरी बसवण्यात आल्याची भूमिका पक्षाची चुकीची असल्याचे त्यांनी सांगत त्यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगितले. पुष्पा सोनवणेंना राजीनामा मागे घ्यायला नव्हे तर जिल्हाधिकार्‍यांकडे द्यायला सांगितले होते, असेही ते म्हणाले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !