भुसावळात निवडणूक, उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर रूटमार्च


भुसावळ : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत आलेला नवरात्रोत्सव सणाच्या पार्श्‍वभूमीवर भुसावळात पोलिसांनी शक्तीप्रदर्शन करीत रूटमार्च काढल्याने नागरीकांमधून सुरक्षिततेची भावना निर्माण झाली तर गुन्हेगारांच्या उरात धडकी भरली. रविवारी सकाळी 11 वाजता शहर पोलिस ठाण्यापासून रूटमार्चला सुरूवात झाली. महात्मा गांधी पुतळा, जळगाव रोड, गवळी वाडा, दगडी पूल, पांडुरंग टॉकीज, वाल्मीक नगर, नृसिंह मंदीर, जवाहर डेअरी, अप्सरा चौक, मोठी मशीद, सराफ बाजार, गांधी चौक, पोस्ट कार्यालय, अमरदीप टॉकीज, रजा टॉवर तेथून वळसा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील रेल्वे स्टेशनजवळील पोलिस चौकीजवळ रूटमार्चचा समारोप झाला.

उपअधीक्षकांच्या नेतृत्वात रूट मार्च
नवरात्रोत्सवाच्या काळात आणि विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, कोणी उपद्रवी असल्यास त्यांच्यावर कारवाई करणे सोपे व्हावे यासाठी एसआरपीच्या जवानांना महत्वपूर्ण ठीकाणांची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. रूटमार्चचे नेतृत्व डीवायएसपी गजानन राठोड यांनी केले. यावेळी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, निरीक्षक दिलीप पगारे, होमगार्डचे प्रमुख नरविरसिंग रावळ आदी उपस्थित
होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !