डोंगरकठोरा खूनप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या मेहुण्यालाही अटक


यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा येथील शरीफ मेहरबान तडवी (17) या युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तालुक्यातील मारुळ येथील रमजान महारू तडवी (25) या अल्पवयीन आरोपीच्या मेहुण्यास रविवारी रात्री अटक करण्यात आली. खून प्रकरणातील संशयीत आरोपींंची संख्या आता दोन झाली आहे. याबाबतची माहिती फैजपूर उपविभागीय पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, तपासाधिकारी सारीका खैरनार उपस्थित होत्या.

रविवारी दुसर्‍या आरोपीच्या आवळल्या मुसक्या
डोंगरकठोरा येथील शरीफ तडवी या युवकाचा बुधवारी रात्री धारदार शस्त्राने गळा कापून खून करण्यात आल्यानंतर गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. बहिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली होती. तो सध्या बालन्यायालयीन कोठडीत आह, तर रविवारी रात्री मारुळ येथील रमजान महारू तडवी या दुसर्‍या संशयीत आरोपीस अटक करण्यात आली. खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर काही तासातच पोलिसांनी 16 वर्षीय अल्पवयीन संशयीतास ताब्यात घेतले होते. तपासाधिकारी सहाय्यक निरीक्षक सारीका खैरनार, हवालदार संजय तायडे यांनी अधिक चौकशी केली असता मारुळ येथील रमजान तडवी या मेहुण्यास बोलविले असता त्याच्या डाव्या हातासही जखम आढळून आली. त्यास कारण विचारले असता गवत कापताना विळा लागल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तेव्हा पोलिसी खाक्या दाखवताच घटनास्थळावर सोबत असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी संशयीत बालगुन्हेगारास शरीफचे त्याच्या बहिणीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. तेव्हापासूनच त्याच्या डोक्यात शरीफला संपवण्याचा कट सुरू होता आणि बालगुन्हेगाराने घटनेच्या रात्री त्यास शौचविधीस जायचे आहे, असे म्हणून फोन करून बोलावले व त्यास तेल्या नाल्याचे काठावर नेवून तेथे त्याच्या डोक्यावर दगड मारून व सुरीने गळा चिरून खून केला. हा कट अत्यंत नियोजनबध्द असल्याने दोन संशयीतासह अन्य आरोपीची संख्या यात आहे का, याबाबतही पोलीस कसोशीने तपास करीत असल्याचे सांगून पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भायश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !