नंदुरबार गुन्हे शाखेची धडक कारवाई : 20 धारदार तलवारींसह संशयीताला अटक


नंदूरबार : जिल्हा परीषद व पंचायत समिती पोट निवडणूक व नवरात्रोत्सवादरम्यान समाजकंटकांवर तसेच गुन्हेगारांवर अंकुश राहण्यासाठी उपाययोजना केल्या जात असताना धडगावातील एका संशयीताकडे तलवारी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत तब्बल एक लाख 28 हजार रुपये किमंतीची 20 लहान-मोठ्या धारदार तलवारी जप्त केल्याने खळबळ उडाली. संजय कागडा वळवी (कात्री, ता.धडगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अवैध शस्त्रांव कारवाई करणेबाबतचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांन गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की , धडगाव गावात मुख्य रस्त्यावर एक इसम हा त्याच्या शेती औजार विक्रीच्या दुकानात मानवी जिवितास घातक असलेल्या लोखंडी बनावटीच्या तलवारी बेकायदेशीररीत्या कब्जात बाळगुन आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत संजय वळवी यास ताब्यात घेतले असता त्याच्या मालकीच्या टपरीत एक लाख 28 हजार रुपये किंमतीची 20 लहान-मोठ्या धारदार तलवारी मिळून आल्या. याप्रकरणी संजय कागडा वळवी (कात्री, ता.धडगाव) याच्या विरोधात पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणार्‍या गुन्हेगारांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.






यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार विनोद जाधव, पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव, पोलीस अमंलदार अभिमन्यू गावीत, दीपक न्हावी, रमेश साळुंके आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !