भुसावळातील आखाड्यात डॉ.मधू मानवतकर ताकदीनिशी रींगणात : माजी आमदार संतोष चौधरी धक्कातंत्रात यशस्वी


12 उमेदवार रींगणात : अपंक्षांमुळे निडणुकीत येणार रंगत

भुसावळ (अमोल देवरे)- भुसावळातील निवडणूक आखाड्यात माघारीच्या दिवशी कोण-कोण दिग्गज माघार घेतात याकडे शहरासह जिल्हावासीयांचे लक्ष लागले असतानाच माजी आमदार संतोष चौधरी यांनी पाठिंबा दिलेल्या डॉ.मधू राजेश मानवतकर या सोमवारी दुपारी अडीच ते पाऊणेतीन वाजेच्या सुमारास पती डॉ.राजेश यांच्यासह माघारीसाठी तहसीलपर्यंत आल्या मात्र याचवेळी काही उमेदवार माघार घेत असल्याने तहसील आवारात त्या थांबल्या असतानाच माजी आमदार संतोष चौधरी यांनी धक्कातंत्राचा वापर करीत डॉ.मानवतकर दाम्पत्याची मनधरणी करण्यात यश मिळवल्याने दाम्पत्य आपल्या पावली माघारी परतले व त्यांनी निवडणूक आखाड्यात आता ताकदीनिशी लढणार असल्याचा निश्‍चय केला आहे. दरम्यान, काँग्रेसचे इच्छूक उमेदवार संजय ब्राह्मणे यांनाही तिकीट न मिळाल्याने ते किल्ला लढवण्याच्या तयारीत असतानाच पक्षश्रेष्ठींनी त्यांचे मन वळवल्याने त्यांनीही माघार घेतली तर एमआयएमचे रवींद्र सपकाळे यांच्यासह नऊ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता निवडणूक रींगणात 12 उमेदवार आहेत. अपक्षांमुळे भुसावळातील आखाड्यात मात्र आता रंगत येणार हे नक्की !

माघारीसाठी नव्हे तर चित्र पाहण्यासाठी आले होते दाम्पत्य
माजी आमदार संतोष चौधरी यांनी भूमिका मांडताना सांगितले की, डॉ.मानवतकर दाम्पत्य यांच्यावर माघारीसाठी दबाव होता मात्र ते दबावाला जुमानले नाहीत, ते अधिकृतरीत्या आता रींगणात लढणार असून आपला त्यांना जाहिर पाठिंबा असणार आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !