येवतीतील विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

बोदवड : तालुक्यातील येवती येथील 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी 10.30 वाजता ही घटना उघडकीस आली. सुलताना बी.शेख युनूस पठाण (25, रा.येवती) असे मृत विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मृत विवाहितेचे वडील शेख नजीर शेख सत्तार (40, रा.हिदायत नगर, बोदवड) यांच्या खबरीनुसार बोदवड पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत विवाहितेला एक लहान मुलगा असून माहेरी बोदवड येथे अंतिम संस्कार करण्यात आले. तपास उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहेत.