रावेरातील अपक्ष उमेदवार अनिल चौधरींचा उद्यापासून प्रचाराचा शुभारंभ


पालमधील लक्ष्मण चैतन्य बापू मंदिरात नारळ वाहून होणार प्रचाराचा शुभारंभ

रावेर : रावेर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार अनिल छबिलदास चौधरी हे मंगळवार, 8 रोजी सकाळी सात वाजता पाचल येथील लक्ष्मण चैतन्य बापू मंदिरात नारळ वाहून प्रचार दौर्‍याला सुरुवात करणार आहेत. प्रसंगी माजी आमदार संतोष चौधरी, कृउबा सभापती सचिन चौधरी, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, नगरसेवक शेख सादिक, माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील, नगरसेवक सुरज चौधरी, अभिमन्यू चौधरी, मुनाफ तडवी, कुर्बान शेख, सीताराम पाटील, पंकज वाघ, दिलीप बंजारा, राजू तडवी, भुरेखा तडवी, मनोज राठोड आदी उपस्थित राहणार आहे.

तालुक्यात प्रचाराचा धुराळा
अनिल चौधरी हे तालुक्यातील पालमध्ये मंगळवारी सकाळी 7.30 ते 8.00 दरम्यान तर 8.30 ते 9.00 गुलाबवाडी, 9.30 ते 10 मोरव्हाल, 10.30 ते 11 ताडजिन्सी, विश्राम जिन्सी, 11 ते 11.30 आभोडे खु, आभोडे बु अशी प्रचार फेरी काढणार आहेत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन कृउबा सभापती सचिन चौधरी, धीरज अनिल चौधरी यांनी केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !