भुसावळात गँगवार : तिघा आरोपींना 14 पर्यंत पोलिस कोठडी


न्यायालयाला छावणीचे स्वरूप : गुन्ह्यातील दुचाकी तापी पात्रातून केली जप्त

भुसावळ : भुसावळचे नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या खरात यांच्यासह त्यांची दोन्ही मुले व मोठ्या बंधूंसह अन्य एकावर कट रचून आलेल्या आरोपींनी अंधाधुंद गोळीबार तसेच चॉपरसह दगडाने हल्ला करून खून केल्याची घटना रविवारी रात्री सव्वा नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेने भुसावळसह राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी शेखर उर्फ राजा हिरालाल मोघे, राजा बॉक्सर मोहसीन उर्फ अजगर खान व मयूर सुरवाडे या तासाभरात अटक करण्यात आली होती. आरोपींना मंगळवारी सकाळी 10.30 प्रचंड बंदोबस्तात भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 14 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यावेळी न्यायालयाला छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान, हत्याकांडाला पूर्वीच्या वैमनस्याची किनार असल्याची दाट शक्यता आहे.

न्यायालयाला छावणीचे स्वरूप
आरोपींना भुसावळ न्यायालयात हजर करण्यापूर्वी न्यायालय परीसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे बाबासाहेब ठोंबे यांच्यासह आरसीपी तुकडी, डीबी कर्मचार्‍यांसह होमगार्ड कर्मचार्‍यांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.









गोळीबाराची कल्पना मात्र बेसावध असताना खरातांवर चढवला हल्ला
अटकेतील तीनही आरोपींनी सुरुवातीला लाल चर्चजवळ रोहित उर्फ सोनू, मुलगा प्रेमसागर तसेच मित्र सुमित संजय गजरे यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी चार फायर करण्यात आले मात्र एकही गोळी खरातसह गजरे यांना न लागल्याने आरोपींनी त्यांचा पाठलाग करीत त्यांच्यावर चॉपरने हल्ला चढवला तर खरात भावंडांनीही आरोपींचा प्रतिकार केला व याचवेळी गजरे हादेखील धावून आल्याने त्याच्या मेंदूत गोळी शिरल्याने तो धारातीर्थी पडला. घटनास्थळावरून पोलिसांना चार झाडलेल्या गोळ्यांच्या रीकाम्या पुंगळ्या तसेच तीन जिवंत काडतूस असलेले मॅगझीन सापडले. खरातांच्या मुलांना संपवल्याने हम्प्या आपल्याला जिवंत ठेवणार नाही ही खुणगाठ बांधूनच तिघांही आरोपींनी आरोपींनी दुचाकीने समता नगर गाठले. याचवेळी नवरात्रोत्सवानिमित्त दांडीया सुरू असताना खरातांना भुसावळात गोळीबार झाल्याचे समजले, मात्र ते बेसावध होवून घराबाहेर बसले असतानाच आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवत अंदाधूंद गोळीबार केला व त्याचवेळी आरोपींनी खरातांवर चॉपरने हल्ला चढवल्याने रक्तबंबाळ अवस्थेत ते पवारांच्या घरात आश्रयाला गेले व त्यांनी दार लावले मात्र आरोपींनी दरवाजावरून खरातांवर चाकू तसेच चॉपरचे सपासप वार केले तर त्याचवेळी त्यांचे बंधूदेखील समोर आल्याने त्यांच्या मानेवर वार करताच अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचाही मृत्यू ओढवला. यावेळी खरातांची बहिण अलका खरात यादेखील धावून आल्या मात्र आरोपींनी त्यांनाही जिवंत ठार मारण्याची धमकी दिली मात्र सुदैवाने त्या बचावल्या.

हत्याकांडानंतर तापी पात्रात फेकली दुचाकी
हत्याकांडानंतर आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एम.एच.19 ए.व्ही.9654) व मोबाईल तापी नदीपात्रात फेकले होते. शहर पोलिसांनी दुचाकी जप्त केली असून मोबाईल मात्र पोलिसांना अद्याप सापडलेले नाही त्यामुळे पोलिस तपासात आरोपींचे कुणाशी संभाषण झाले वा नाही ही बाब लवकरच समोर येणार आहे.

समता नगर परीसरात बंदोबस्त कायम
या घटनेच्या अनुषंगाने समता नगर परीसरात पोलिसांनी आरसीपीसह जिल्ह्यावरून कुमक मागवून बंदोबस्त वाढवला आहे. रआरोपींनी खूनासाठी वापरलेले दोन चाकू, दोन गावठे कट्टे तसेच तीन जिवंत काडतुस असलेली मॅग्जीन व अन्य एक जिवंत काडतुस असलेली मॅग्जीन जप्त केली आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !