रावेरात चौघांची माघार : दहा उमेदवार निवडणूक रींगणात


रावेर : रावेर विधानसभा मतदारसंघात माघारीच्या अंतीम दिवशी चौघा उमेदवारांनी माघार घेतल्याने या मतदारसंघात दहा उमेदवार निवडणूक रींगणात आहेत. सोमवारी ललिता चौधरी, हर्षा चौधरी, सुरैय्या बानो दगडू शहा, नूर मोहम्मद, ईब्राहीम तडवी या चार उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे निडणूक रींगणात 10 उमेदवार आहेत.

रावेरात दहा उमेदवार रींगणात
रावेर विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार हरीभाऊ जावळे (भाजपा), माजी आमदार शिरीष चौधरी (काँग्रेस), अनिल चौधरी (अपक्ष), संतोष ढिवरे (बसपा), हाजी सैय्यद मुस्ताक सैय्यद कमरुद्दीन (वंचित बहुजन आघाडी), विवेक ठाकरे (एआयएमआयएम), गयासुद्दीन काझी (अपक्ष), डी.डी.वाणी (अपक्ष), राजाराम सोनार (अपक्ष), संजय तडवी (अपक्ष) हे दहा उमेदवार निवडणूक रींगणात आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !