माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या उपस्थितीत आमदार जावळेंच्या प्रचाराचा शुभारंभ

श्री क्षेत्र ओंकारेश्वर मंदिरावर पूजा, अभिषेकानंतर आमदार जावळेंनी मतदारांशी साधला संवाद
रावेर : तालुक्यातील तामसवाडी येथील श्री क्षेत्र ओंकारेश्वर मंदिरावर पूजा, अभिषेक केल्यानंतर आमदार जावळे यांच्या प्रचाराचा सोमवारी सकाळी शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, अशोक कांडेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.