मनूर बु.॥ च्या शेतकर्‍याची आत्महत्या


विषारी द्रव प्राशन करून संपवले जीवन : कारण गुलदस्त्यात

बोदवड- तालुक्यातील मनुर बु.॥ गावातील संतोष शामराव पाटील (34) या शेतकर्‍याने मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास काहीतरी विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केल्याची घटना. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. भगवान शामराव पाटील (48) यांनी बोदवड पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तत्पूर्वी अत्यवस्थ अवस्थेतील संतोष पाटील यांना बोदवड ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. मृत संतोष पाटील यांनी मंगळवारी काहीतरी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. तपास पोलिस कॉन्स्टेबल संजय भोसले करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !