पिंप्राळ्यातील विवाहितेचा छळ : पतीसह सात जणांविरोधात गुन्हा
जळगाव : शहरातील पिंप्राळा येथील विवाहितेचा कौटुंबिक कारणावरून मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या कारणावरून पतीसह सात जणांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रूपाली घनश्याम कोतवाल (32, रा.वाणी गल्ली, पिंप्राळा) यांचा विवाह जळगावातील इंद्रप्रस्थ नगरातील घनश्याम प्रभाकर कोतवाल यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यांनतर पती घनश्याम कोतवाल यांनी कौटुबिक कारणावरून मानसिक व शारिरीक छळ सुरू केला. यासाठी सासु लताबाई प्रभाकर बडगुजर, दीर ललित प्रभाकर बडगुजर, देरानी मिनाक्षी ललित बडगुजर, लहान दिर योगराज प्रभाकर बडगुजर सर्व रा. इंद्रप्रस्थ नगर, नणंद उज्जवला राजेंद्र बडगुजर, लहान नणंद भारती निलेश बडगुजर रा. जळगाव यांनी देखील लहान लहान गोष्टींवरून छळ व क्रुर वागणूक दिली. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी पिंप्राळा येथे निघून आल्या. रूपाली कोतवाल यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्यात क्रारीवरून बुधवारी 13 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण करीत आहेत.