काश्मीर भारताचा अविभाज्य घटक -अमित शहा

बीडमध्ये प्रचार सभा : मोदी सरकारने 70 वर्षांपासून प्रलंबित कामे लावली मार्गी
बीड : पंतप्रधान मोदी गेल्या 70 वर्षांपासून प्रलंबित असलेली अनेक कामं मार्गी लावत असून काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असल्याचे प्रतिपादन बीडमधील प्रचारसभेत भाजपा अध्यक्ष अमित शहांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ प्रसंगी त्यांच्या हस्ते फोडल्यानंतर 370 तोफांची (फटाक्यांची) सलामी त्यांना देण्यात आली. प्रसंगी अमित शहांनी मोदी सरकारच्या कामांचं तोंडभरुन कौतुक केलं. ‘भगवानबाबांनी समाजासाठी आयुष्य वेचलं. त्यांनी समाजाला शिक्षणाचा संदेश दिला. शिक्षणातून आयुष्याला दिशा मिळू शकते, याची जाणीव त्यांनी समाजाला करून दिली. त्याओबीसी, वंचितांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेलं काम अतिशय मोठं आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे भगवानबाबांच्या विचारांनी जगले. त्यांनी ऊसतोड कामगार, मजुरांचे प्रश्न मार्गी लावले. आता त्यांच्या कन्या पंकजा मुंडेदेखील त्याच मार्गानं वाटचाल करत आहेत,’ असं शहा म्हणाले. ओबीसींना संवैधानिक दर्जा देण्याचं काम आम्ही केलं. गेल्या 70 वर्षांपासून प्रलंबित असलेली अनेक कामं मोदींनी गेल्या पाच वर्षांमध्ये मार्गी लावल्याचंदेखील शहा म्हणाले.