फुलसावंगीत पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीनेही मृत्यूला कवटाळले


यवतमाळ : पतीने विहिरीत आत्महत्या केल्याची माहिती पडताच पत्नीनेही गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना महागाव तालुक्याच्या फुलसावंगी दसरा सणाच्या दिवशी घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली. रहेमान फाट्याजवळ सार्वजनिक विहिरीत फकीरा गणपत पिटलेवाड (वय 22 वर्षे) याचा मृतदेह मंगळवारी सकाळी दिसताच क्षणभरात गावभर चर्चा पसरली तर मृताची पत्नी निलाबाई फकीरा पिटलेवाड यांनीदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या चार दिवसा अगोदर पत्नी व आई हे मृतकाच्या सासरवाडीला काही कामानिमित्त गेले होते. ते सोमवारी सायंकाळी गावात परतले मात्र दुसर्‍या दिवशी मंगळवारी दोघांचाही वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !