रावेरातील अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांचा आज ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात

मतदारांकडून अनिल भाऊंच्या प्रचार रॅलींना मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
रावेर : रावेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अनिल छबीलदास चौधरी यांनी ग्रामीण भागात प्रचाराचा धुराळा उडवला असून ग्रामीण भागातील मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बुधवार, 10 ऑक्टोबर रोजीदेखील दिवसभर त्यांचा ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात कायम राहणार आहे. प्रचार दौर्यादरम्यान मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून त्यांचे महिलांकडून औक्षणही केले जात आहे.
बुधवारी या भागात प्रचाराचा झंझावात
बुधवारी सकाळी रसलपूर, बक्षीपूर, खिरोदा भागात सकाळी सात ते 11 दरम्यान प्रचार रॅली काढण्यात येणार असून दुपारनंतर मुंजलवाडी, भातखेडा, उटखेडा, लालमाती, सहस्त्रलिंग, गारबर्डी तसेच सायंकाळी गारखेडा, निमड्या तसेच पिंपरकुंड भागात प्रचार रॅली काढण्यात येणार आहे.

माजी आमदारांची खंबीर साथ
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी बंधू अनिल चौधरींच्या प्रचारासाठी रींगणात उडी घेत आपली ताकद पणाला लावली आहे. भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्यासह कृउबा सभापती सचिन चौधरी व पदाधिकारी कार्यकर्त्यांकडूनही जोरदार प्रचार केला जात आहे.