फैजपूर-शेगाव पदयात्रा 30 ऑक्टोबर रोजी

फैजपूर : सालाबादाप्रमाणे फैजपूर परीसरातून जय गजानन ग्रुप फैजपूरतर्फे फैजपूर ते शेगाव पदयात्रा बुधवार, 30 ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता फैजपूर येथून रवाना होणार आहे. मुक्ताईनगर, मलकापूर आंबोडामार्गे पदयात्रा शनिवार, 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजत श्री गजानन महाराज मंदिर, शेगाव येथे पोहचणार आहे. सहभाग नोंदवणार्या भाविकांनी आपले प्रवेश अर्ज वारीप्रमुख दीपक होले, दिनकर नारखेडे, योगेश नारखेडे, गिरीश नेमाडे यांच्याकडे त्वरीतत भरून द्यावा, असे आयोजकांनी कळविले आहे.