आगामी सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार
वंचित आघाडीचे विनोद सोनवणे : भुसावळात महत्वपूर्ण बैठक
भुसावळ : वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच शासकीय विश्रागृहावर झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढेल, अशी माहिती सोनवणे यांनी दिली.
वंचित मारणार जोरदार मुसंडी
संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत असून सोशल इंजिनिअरींगचा यशस्वी प्रयोग झालेल्या अकोला जिल्हा परीषदेत राबवण्यात आल्यानंतर त्यात वंचित बहुजन आघाडीने चांगले यश मिळवले. येत्या काळात जिल्ह्यात नगरपरीषदेत निवडणूक येवू घातली आहे त्यात जोरदार मुसंडी मारण्याच्या इराद्याने वंचितने तयारी सुरू केल्याचे जिल्हाध्यक्ष सोनवणे म्हणाले. जिल्हा महासचिव दिनेश इखारे यांनी प्रस्तावनेत पक्ष बांधणी संदर्भात महत्वाच्या सुचना दिल्या तसेच महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद शफी शेख, कामगार आघाडीचे चिटणीस बालाजी पठाडे, जिल्हा संघटक सचिव सचिन वानखेडे, रावेर तालुकाध्यक्ष बाळु शिरतुरे, यावल तालुकाध्यक्ष मनोज कापडे, बोदवड तालुकाध्यक्ष सुपडा निकम, भुसावळ तालुकाध्यक्ष संतोष कोळी, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाध, महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदना आराक, जिल्हा उपाध्यक्षा मीरा वानखेडे, तालुका सचिव गणेश इंगळे यांनी मार्गदर्शन केले.


या पदाधिकार्यांचा सत्कार
महिला आघाडी कार्यकारीणी जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे, उपाध्यक्ष आशा सोनवणे, महासचिव वंदना आराक, जिल्हा संघटक शोभा सोनवणे, उपाध्यक्ष मीरा वानखेडे, महासचिव जरीना तडवी, सचिव सुनीता पालवे, मीना भालेराव, उपाध्यक्ष सुलभा मुसळे, अलका पारधी, दीपाली बार्हे यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी जिल्हा आयटी प्रमुख सचिन बार्हे, जिल्हा संघटक राजेंद्र बारी, प्रमोद बाविस्कर, नागसेन सुरडकर, नितीन सपकाळे, सुभाष इंगळे, राजेश गवळी, मै.कादरी भाई, विजय सवकारे, दीपक मेघे, भगवान मेघे, देवदत्त मकासरे, विनोद तायडे, सचिन वानखेडे, गणेश इंगळे, रूपेश कुर्हाडे, कांतीलाल गाढे, दिलीप भालेराव, दौलत अंधाळगळे, राजेश दुबे, सलीम शेख आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा संघटक सचिव सचिन वानखेडे यांनी तर आभार भुसावळ तालुका सचिव गणेश इंगळे यांनी मानले.


