अपक्ष उमेदवार डॉ.मधू मानवतकर यांचा उद्यापासून ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात


साकेगावातून होणार प्रचाराचा शुभारंभ : माजी आमदार संतोषभाऊंच्या नेतृत्वात निघणार रॅली

भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉ.मधू मानवतकर या शुक्रवारपासून ग्रामीण भागात प्रचार दौर्‍यांचा शुभारंभ करणार आहेत. शुक्रवारी सकाळी साकेगाव येथून प्रचार रॅलीला त्यांचा शुभारंभ होणार आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासह जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात प्रचार रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांसह शेतकी संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !