दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीत वाद : मध्यस्थी जखमी


भुसावळ : शहरातील केशवनगर भागात दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीत दांडीया खेळण्याहरून वाद निर्माण झाला. हा वाद मिटवण्यासाठी आलेल्या एका युवकावर दोघांनी काठीने डोक्यावर मारहाण करून जखमी केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बुधवारी शहरातील दुर्गा देवी मूर्तीची विसर्जन मिरवणूक सुरू होती मात्र रात्री नऊ वाजेच्या सुमारास दांडीया खेळत असतांना कुंदन वानखेडे व अनिश विश्‍वकर्मा (दोघे रा.केशवनगर) यांचा मंडळातील गजानन बोरोले यांच्याशी वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी पुढे आलेल्या प्रकाश पंडीत सावळे (रा.केशवनगर) याच्या डोक्यावर संतापलेल्या कुंदन आणि अनिश यांनी काठीने मारहाण केली. यामध्ये प्रकाश सावळे जखमी झाल्याने त्याला रुणालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी प्रकाश सावळे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !