आमदार संजय सावकारेंना भोरगाव लेवा पंचायतीचा पाठिंबा

कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांची माहिती : सोशल मिडीयावर व्हायरल पत्र दिशाभूल करणार : अफवांवर विश्वास न ठेवण्याचे केले आवाहन
भुसावळ : भुसावळ विधानसभेतील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांना लेवा पाटीदार समाजाने पाठिंबा दिला असून सर्व समाजबांधवांनी एकसंघपणे आमदार सावकारे यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणावे, असे आवाहन भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांनी समाजबांधवांना केले.
सोशल मिडीयावरील पत्र माझे नाहीच
गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर व्हायरल झालेले पत्र आपले नाही वा आपण काढलेदेखील नाही, अशी माहितीही कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांनी देत लेवा पाटीदार समाजाने एकसंघपणे आमदार संजय सावकारे यांच्या पाठिशी उभे रहावे, असे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले. लेवा समाज हा बहुजन समाजाशी समरस झाला असून कुठलाही भेदभाव नाही, असे सांगून त्यांनी समाजबांधवांना एकसंघपणे आमदारांच्या पाठिशी उभे राहून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहनही केले आहे.
