विधानसभेतील नाथाभाऊंची उणीव भरून काढण्यासाठी आमदार हरीभाऊ जावळेंना विजयी करा


खासदार रक्षा खडसे यांचे खिरोदा गावातील सभेत आवाहन

खिरोदा : नाथाभाऊंची विधानसभेतील उणीव पूर्ण करण्यासाठी आमदार हरीभाऊ जावळे यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा, असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी शनिवारी खिरोदा येथील सभेत केले. खासदार खडस म्हणाल्या की, हरीभाउ जावळे हे नेहमीच शेती आणि शेतकरी यांच्या संदर्भात सातत्याने प्रश्न उचलत आले आहे आणि त्या माध्यमातून शेतकर्‍यांना न्याय देण्याची भूमिका त्यांची राहिली आहे. विधानसभेत आता नाथाभाउ नसणार असल्याने त्यांची उणीव हरीभाऊंच्या माध्यमातून भरली जाणार आहे. आपल्या भागातील शेतकर्‍यांच्या समस्या आणि प्रश्न मांडण्यासाठी आपल्या हक्काचे आमदार म्हणून हरीभाऊंना निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री कनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि आमदार हरीभाऊ जावळे काम करीत असून भविष्यातही करणार असल्याची ग्वाही त्यांनी प्रसंगी दिली.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी जिल्हा परीषदेचे माजी सदस्य भरत महाजन, हर्षल पाटील, गोवर्धन ढाके, नेहा गाजरे, सरपंच संता भारंबे, विजय नेहते, करुणा चौधरी, सरीता तायडे, कामिनी चौधरी, प्रशांत तायडे, उपसरपंच राहुल चौधरी, संजय नेहते, बापू इंगळे, महेंद्र माळी, आकाश चौधरी, सांडू चौधरी, गोविंदा चौधरी, युवराज तायडे, राहुल बडगे, प्रशांत वाघ, भास्कर चौधरी, वासुदेव चौधरी, वासुदेव पाटील, लुकमान तडवी, राजू माळी व खिरोदा ग्रामस्थ उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !