भुसावळ ग्रामीणमध्ये आमदार संजय सावकारे यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद


भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपा, महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांनी शनिवारी दिवसभरात तळवेलसह परीसरात प्रचार रॅली काढत मतदारांशी संवाद साधला. याप्रसंगी मतदारांनी त्यांना आशीर्वाद दिले तर सुवासिनींनी त्यांचे औक्षणही प्रसंगी केले. तळवेलच्या प्रचार दौर्‍याप्रसंगी श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आमदारांनी दर्शन घेतले तसेच प्रत्येक गावात देवादिकांचे दर्शन घेतले तर पिंपळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास त्याचप्रमाणे तळवेल येथे महर्षी वाल्मीकी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रचाराचा प्रारंभ केला. शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आमदार सावकारे यांनी वरणगाव येथील आयुध निर्माणी फॅक्टरीच्या प्रवेश द्वाराजवळ कर्मचार्‍यांच्या भेटीगाठी घेतल्या.

ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात
सुसरी तसेच पिंपळगाव बुद्रुक, पिंपळगाव खुर्द, ओझरखेडा, बोहर्डी बुद्रुक , बोहर्डी खुर्द, दर्यापूर, तळवेल आदी गावात गल्लीबोळात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. आमदार सावकारे यांनी थोरा-मोठ्यांचे आशीर्वादही घेतले. त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये युवकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता तर महिलांनी ठिकाणी औक्षण करून विजयच्या शुभेच्छा दिल्या.

यांचा होता सहभाग
या प्रचार फेरीत तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य राजेंद्र साहेबराव चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र पुंडलीक चौधरी, सुनील महाजन, माजी उपसभापती गोलू पाटील, कृउबा समितीचे माजी सभापती सोपान भारंबे, शेतकी संघाचे संचालक प्रशांत निकम, खडका येथील चुडामण भोळे, दीपक भिरूड, संजय पाटील, भैय्या महाजन, वरणगाव येथील नगरसेवक गणेश धनगर, निंभोरा येथील माजी सरपंच गुरुजीतसिंग चाहेल, माजी उपसरपंच राजू साबळे, वेल्हाळे येथील सरपंच विजय पाटील, प्रशांत पाटील, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य संजय पाटील, तळवेल येथील सरपंच डॉ.सुनील पाटील, माजी सभापती मंगला झोपे, माजी सरपंच ज्ञानदेव झोपे, विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत पाटील, रवींद्र नारायण पाटील, अर्जुन इंगळे, सुधाकर सरोदे, मंगेश पाटील, कपिल वायकोळे, बोहर्डी येथील सरपंच निलेश पाटील, उपसरपंच एकनाथ पाटील, वासुदेव पाटील, अनिल पाटील, रामा पाटील, दर्यापूर येथे पी.एस.पाटील, विलास पाटील, संदीप पाटील, पिंपळगाव बुद्रुक येथील सरपंच वासुदेव सरोदे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप सरोदे , उपसरपंच निवृत्ती पाटील, प्रितेश बेंडाळे, नीलेश बेंडाळे, देवानंद बावस्कर, प्रमोद सरोदे, वासुदेव सरोदे , पिंपळगाव खुर्द येथे अरुण इंगळे, अनिल पाटील, तुषार पाटील, लक्ष्मण पाटील, दिलीप पाटील, विनोद राजपूत, पिंटू वारके , समाधान शिंदे, योगेश जोहरे, रवींद्र पाटील माजी सरपंच पुंडलिक सुरवाडे, शिवाजी , देवानंद गोपाळ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !