विधान परीषद निवडणुकीत भाजपाचे विद्यमान आमदार अमरीशभाई पटेल बिनविरोध


धुळे : विधान परीषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून विद्यमान आमदार अमरीशभाई पटेल तर महाविकास आघाडीकडून गौरव वाणी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उभयंतांमध्ये सरळ लढत होईल, असा अंदाज असतानाच अचानक गौरव वाणी यांनी अर्ज माघारी घेतल्याने अमरीशभाई यांची बिनविरोध निवड झाली आहे. अमरीशभाई यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

कोल्हापूरात पालकमंत्र्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा
धुळे जिल्ह्यात भाजपाचे उमेदवार आमदार अमरीशभाई पटेल बिनविरोध निवडून आले तर दुसरीकडे कोल्हापूर विधानपरीषदेची जागा बिनविरोध करण्याचा निर्णय झाल्याने पालकमंत्री सतेज पाटील यांचा विजयी मार्ग मोकळा झाला. भाजप नेते फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी धनंजय महाडिक यांना फोन करुन अर्ज माघार घेण्याची सुचना दिली. या सुचनेवरुन भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांना आपले अर्ज माघारी घेतले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना धनंजय महाडिक यांनी पक्ष आदेश पाळत आपण अर्ज माघार घेतल्याचे सांगितले.या निवडणुकीसाठी 10 डिसेंबरला मतदान होणार होते. मात्र ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याने पालकमंत्री सतेज पाटील यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. राज्यातील विधानपरीषद निवडणुका बिनविरोध होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.






 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !