भुसावळात किरकोळ कारणावरून हाणामारी : दोन्ही गटातील चौघे जखमी


भुसावळ : शहरातील न्यू पोर्टर चाळीत गुरुवारी रात्री दोन गटात किरकोळ कारणावरून वाद उफाळून झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील चौघ जखमी झाले. या प्रकरणी शहर पोलिसात दोन्ही गटाच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. न्यु. पोर्टर चाळीत गुरूवारी इलेक्ट्रीक पोलवर वायरमन लाईट लावत असतांना इम्रानखान हा वायरमनशी का बोलला ? या कारणावरून संशयीत आरोपी नूर मोहंमद सिध्दीक खान, मोहंमद सिध्दीक जमशेर खान, भुरीबाई सिध्दीक खान व त्यांचा नोकर बब्या (पूर्ण नाव माहित नाही) यांनी इम्रान खान यांच्या डोक्यात कुर्‍हाड मारली तसेच डोके फोडूलन जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला. या हाणामारीत इम्रान खान, शब्बीर अली मोहर अली (रा. न्यु. पोर्टर चाळ, भुसावळ) हे जखमी झाले. इम्रान खान यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक वैभव पेठकर पुढील तपास करीत आहे.

दुसर्‍या गटाचीही तक्रार
दुसर्‍या गटातर्फे मोहमद सिध्दीक जमशेर खान यांनी फिर्याद दिली. वायरमन लाईट बसवित असतांना ईम्रानखान त्यांच्याशी बोलल्याच्या कारणावरून उभयंतामध्ये वाद विकोपाला गेल्याने इम्रान खान व शब्बीर अली यांनी कुर्‍हाडीने व पहारीने मोहंमद सिध्दीक, नूर मोहंमद यांच्या डोक्यावर, तोंडावर मारले. यात मोहमद सिध्दीक, नूर मोहंमद व अजिजुन्नीसाबी मो. सिध्दीक (रा. न्यु. पोर्टर चाळ, समता नगर, भुसावळ ) हे जखमी झाले. मोहंमद सिध्दीक यांच्या फिर्यादीवरून इम्रान खान शब्बीर अली, शब्बीर अली मोहर अली, नसीमुन्नसा मोहंमद शब्बीर, जिनतबी मो. शब्बीर (रा.न्यु पोर्टर चाळ, भुसावळ) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मोहंमद अली सय्यद करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !