भुसावळात बालिकेवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नातील आरोपीला जमावाकडून चोप


भुसावळातील जामनेर रोडवरील घटना : मनोविकृत इसम दिसताच जमावाने पाठलाग करीत बदडले

भुसावळ : शहरात गुरूवारी सांयकाळी दुकानावर चॉकलेट घेण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन बालिकेवर एका माथेफीरूने गल्लीत बोळात नेवून अतिप्रसंग करीत तिच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता तर बालिकेने रडतच ही बाब पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी संशयीताचा शोध घेतला मात्र तो मिळून नाही मात्र शनिवारी सायंकाळी शनिवारी जामनेर रोडवर संशयीत इसमाच दिसल्याने नागरीकांनी त्यास पब्लिक मार देत बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध विनयभंग व पोस्कोप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरात वाढली गुन्हेगारी
शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी झालेल्या गोळीबाराच्या हत्याकांडानंतर चार दिवसांनी दीपनगर येथे राखाड वाहतूक करणार्‍या व्यावसायीकावर गोळीबाराचा प्रयत्न झाला तर याच दिवशी शहरातील जामनेर रोडवरील भवानी नगरातील एक सहा वर्षीय अल्पवयीन बालिका सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास दुकानावर चॉकलेट घेण्यासाठी जात असताना या भागात दबा धरून बसलेल्या एका मनोविकृताने बालिकेला लगतच्या गल्लीच्या बोळात नेवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने बालिका भेदरली व तिने कुटुंबीयांनी रडत जात घटना सांगितले. त्यावेळी घटनास्थळावरून आरोपी निसटला तर विनाकारण बदनामी नको म्हणून कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात जाणे टाळले मात्र या गुन्ह्यातील संशयीत माथेफीरू शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जामनेर रोडवर दिसून आल्याने नागरीकांनी त्याला चांगला चोप दिला व बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयीत हा शहरातीलच इमलीपुरा भागातील फकीरवाड्यातील रहिवासी असून बॅण्डमध्ये तो कामास असल्याची माहिती आहे. पीडीत बालिकेच्या आईने बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला तर आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले.

तिघा भिक्षुकांनाही झाली होती मारहाण
गत महिनाभरापूर्वी शहरातील जुने सातारा भागात तीन भिक्षुक मुले पकडण्यासाठी आल्याची अफवा पसरल्यानंतर नागरीकांनी त्यांना चांगलाच चोप दिला होता मात्र शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून भिक्षुकांना जमावाच्या तावडीतून सोडवले. अन्यथा राईनपाडा येथील घटनेची शहरातही पुनरावृत्ती झाली असती. या प्रकरणी पोलिसांनी भिक्षुकांची सविस्तर माहिती घेतली असता ते त्यांच्याजवळ भाड्याचे पैसे नसल्याने ते रेल्वेस्थानकावरून जळगावरोडने महामार्गावरून नातेवाईकाच्या शोधात धुळ्याकडे जात असल्याचे सांगितले. चौकशीनंतर पोलिसांनी या भिक्षुकांना भाड्यासाठी पैसे देवून रवाना केले होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !