यावल मुख्याधिकार्यांना मनस्ताप ; चोरट्यांनी लांबवला मोबाईल
बसमधून उतरताना चोरट्याने केले काम फत्ते ; पदभार स्वीकारला
यावल- वरणगाव पालिकेतून यावल येथे बदली झालेल्या बबन तडवी हे पदभार स्वीकारण्यासाठी गुरुवारी सकाळी बसने यावलला बसस्थानकावर पोहोचले मात्र बसमधून उतरताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांचा मोबाईल लांबवला. यानंतर तडवी यांनी पालिका गाठत पदभार स्वीकारून कर्मचार्यांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. पावसाळ्यात योग्य उपाययोजना राबवून खबरदारी घ्यावी, अशा सूचना केल्या.