भालोदमध्ये पुष्प वर्षाव करीत आमदार हरीभाऊ जावळेंचे स्वागत


प्रचार रॅलीला मतदारांकडून प्रतिसाद : रांगोळ्यांनी अंगणही सजवले

भालोद : रावेर विधानसभेतील भाजपा महायुतीचे उमेदवार नामदार हरीभाऊ जावळे यांच्या प्रचारार्थ रविवारी भालोदमध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीचे मतदारांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले शिवाय ग्रामस्थांनी रॅलीचे स्वागत केले. गावातील रस्ते रांगोळ्यांनी सजवण्यात आले होते शिवाय ग्रामस्थांनी आमदार जावळेंवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. सुवासिनींनी त्यांचे ठिकठिकाणी औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले.

यांचा प्रचार रॅलीत सहभाग
प्रचार रॅलीत मसाका चेअरमन शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, हर्षल पाटील, राकेश फेगडे, उमेश पाटील, योगराज बर्‍हाटे, नारायण चौधरी, गणेश नेहते, लक्ष्म चौधरी, नितीन चौधरी, मोहन जावळे, मिनल जावळे, भारती चौधरी, सरपंच मीना भालेराव, मनोज जावळे, दिलीप चौधरी, अशोक महाजन, उपसरपंच जाबीर खान, नीळकंठ चौधरी, रमेश झांबरे, रेहाना तडवी आणि सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !