भुसावळ ग्रामीणमध्ये अपक्ष उमेदवार सतीश घुले यांच्या प्रचाराचा झंझावात


वांजोळासह, गोंभी, भानखेडा, जोगलखेड्यासह सुनसगावात मतदारांच्या घेतल्या भेटीगाठी

भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सतीश भिका घुले यांनी रविवारी दुपारी भुसावळ तालुक्यातील वांजोळासह, गोंभी, भानखेडा, जोगलखेडा व सुनसगाव गावाला भेट देवून मतदारांच्या भेटी-गाठी घेतल्या. याप्रसंगी त्यांनी मतदारांशी संवादही साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक समर्थकांनी त्यांच्यासोबत ग्रामीण भागातील मतदारांशी संवाद साधला.

परीवर्तनासाठी कौल द्या -सतीश घुले
भुसावळ शहरासह ग्रामीण भागात मतदारांशी संवाद साधत असून त्यांच्या गाठी-भेटी घेत आहे. परीवर्तनासाठी आपण कौल मागत असल्याचे अपक्ष उमेदवार सतीश घुले म्हणाले.

यांचा प्रचार रॅलीत सहभाग
अपक्ष उमेदवार सतीश घुले यांच्या प्रचार रॅलीत प्रशांत बर्‍हाटे, राजेश चौधरी, निलेश इंगळे, ईश्‍वर पटेल, जमील बागवान, हेमंत वाघ, प्रभाकर रणदिवे, मनोज राजपूत, रणजीत खरारे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !