भुसावळ ग्रामीणमध्ये आमदार संजय सावकारे यांच्या रॅलीला प्रतिसाद

आमदारांनी मतदारांशी साधला संवाद : सुवासिनींनी औक्षण करीत दिले आशीर्वाद
भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार संजय वामन सावकारे यांनी सोमवारी तालुक्यातील जाडगाव, मन्यारखेडा, कपिलवस्ती, फुलगाव, फुलगाव कॉलनी, अंजलसोंडे, कठोरा बु.॥ व खुर्द गावात प्रचार रॅली काढली. प्रसंगी सुवासिनींनी आमदारांचे औक्षण करीत त्यांना आशीर्वाद दिले तर आमदारांनीही मतदारांशी संवाद साधला.
यांचा प्रचार रॅलीत सहभागी
जि.प.चे माजी सदस्य राजेंद्र साहेबराव चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी, सुनील नेहते, सोपान भारंबे, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, पंचायत समिती उपसभापती वंदना उन्हाळे, कठोरा सरपंच प्रशांत पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
