विवेक ठाकरे हे ठेवीदारांचे नेते -खासदार असुद्दीन ओवेसी

फैजपूर : एमआयएमचे उमेदवार विवेक ठाकरे हे ठेवीदारांच्या हक्कासाठी लढत असून त्यांचे ठेवीदारांना न्याय देण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असुद्दीन ओवेसी यांनी येथे केले. यावेळी त्यांनी केंद्रासह राज्यातील सत्ताधारी सरकारवर टिकेची तोफ डागली. रावेर विधानसभा मतदारसंघातील एमआयएम पक्षाचे उमेदवार विवेक ठाकरे यांच्या प्रचारासाठी रविवारी दुपारी ओवीसी यांची प्रचार सभा झाली.
यांची सभेला उपस्थिती
सभेप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष डॉ.खालीद परवेज यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष फिरोज शेख, महासचिव मुजाहिद शेख, सुधाकर भंगाळे, कासम खाटीक, राजेंद्र वारके, खुशाल भंगाळे, चैतन्य बोरोले, खेमचंद्र बोंडे, प्रचार समिती प्रमुख अशरफ तडवी, सहप्रमुख नावेद खान, सचिव कलीम खान, झोन अध्यक्ष रेहान जहागीरदार, जळगाव लोकसभा अध्यक्ष जिया बागवान, नावेद खान, फैजपूर शहराध्यक्ष इम्रान शेख, महासचिव इम्रान खान, यावल शहराध्यक्ष आबीद खान, महासचिव वसीम शेख, रावेर शहराध्यक्ष अकबर खान, महासचिव वसीम शेख, असीम खान आदी उपस्थित होते.
