वरणगावात आमदार संजय सावकारेंच्या प्रचारार्थ रॅली

दिराच्या प्रचारार्थ भावजयींनी खोचला पदर : रॅलीला प्रतिसाद
भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदार संघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संजय वामन सावकारे यांच्या प्रचारार्थ सोमवारी वरणगाव शहरात जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली.
यांचा प्रचार रॅलीत सहभाग
प्रचार रॅलीत वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेविका माला मेढे, मेहनाजबी इरफान पिंजारी, साजीद कुरेशी, इरफान पिंजारी, हाजी अल्लाउद्दीन सेठ, गणेश धनगर, सहकारमित्र चंद्रकांत बढे, सुनील माळी, शामराव धनगर, नारायनसेठ जैस्वाल, प्रवीण ढवळे, नगरसेवक गणेश धनगर, नटराज चौधरी, आकाश निमकर, तेजस जैन, हितेश चौधरी, शेख फहिम, शेख अल्लाउद्दीन, प्रदीप भंगाळे, प्रमोद सरोदे, डी.के.खाटीक, रामदास माळी, संदीप माळी, धीरज माळी, महेश माळी, रामू माळी, सचिन माळी, कुंदन माळी, लखन माळी, शेख जावेद शेख युसूफ, शंकर पवार, रमेश पालवे, सुधाकर पोळ, रमेश माळी व नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परीसरातील नागरीक उपस्थित होते.
ग्रामीण भागात आमदारांनी काढली रॅली
भुसावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संजय वामन सावकारे यांनी सोमवारी तालुक्यातील जाडगाव, मन्यारखेडा, कपिलवस्ती, फुलगाव, फुलगाव कॉलनी, अंजलसोंडे, कठोरा बु.॥ व खुर्द गावात प्रचार रॅली काढली. प्रसंगी सुवासिनींनी आमदारांचे औक्षण करीत त्यांना आशीर्वाद दिले तर आमदारांनीही मतदारांशी संवाद साधला. जि.प.चे माजी सदस्य राजेंद्र साहेबराव चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी, सुनील नेहते, सोपान भारंबे, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, पंचायत समिती उपसभापती वंदना उन्हाळे, कठोरा सरपंच प्रशांत पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
