भुसावळातील अपक्ष उमेदवार सतीश घुले यांनी घेतल्या मतदारांसह व्यापार्यांच्या भेटीगाठी

भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सतीश भिका घुले यांनी भुसावळ शहरासह तालुक्यात मतदारांच्या गाठीभेट घेत प्रचाराला वेग दिला आहे. दूरदर्शन हे प्रचारचिन्ह त्यांना निवडणूक आयोगाकडून मिळाले आहे. भुसावळ शहराच्या विकासासाठी मतदारांनी आपल्याला कौल द्यावा, असे आवाहन त्यांच्याकडून केले जात आहे. भुसावळ शहर व ग्रामीण भागातील विविध मुद्यांना सोबत घेवून ते प्रचाराच्या रींगणात उतरल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे.
शहर व ग्रामीण भागात जोरदार प्रचार
अपक्ष उमेदवार घुले यांनी भुसावळ शहरासह वांजोळा, गोंभी, भानखेडा, जोगलखेडा व सुनसगाव, कुर्हा यासह विविध गावांना भेटी दिल्या असून मतदारांशी सातत्याने संवाद साधत आहेत. अनेक कार्यकर्ते त्यांच्या प्रचारासाठी कामाला लागले आहेत.
