भुसावळसह तालुक्यातील रस्त्यांसह सिंचनाचे प्रश्न सोडवणार

आमदार संजय सावकारे यांची प्रचारादरम्यान मतदारांना ग्वाही
भुसावळ : आगामी पाच वर्षात शहरातील रस्ते, गटारी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील शेती सिंचन व शेत रस्त्यांच्या प्रश्नास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही, भाजपा, शिवसेना, महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांनी सोमवारी प्रचारादरम्यान मतदारांना दिली.
भुसावळ ग्रामीणमध्ये जोरदार प्रचार
भाजपा-शिवसेना, आरपीआय, रासप महायुतीचे उमेदवार व आमदार संजय सावकारे यांनी सोमवारी तालुक्यातील जाडगाव, मन्यारखेडा, फुलगाव, फुलगाव कॉलनी, तपतकठोरा, अंजनसोडे, सावतर, टाकळी, काहुरखेडा आदी परीसरात प्रचार दौरा केला. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधत आगामी पाच वर्षात शहर व तालुक्यात रस्त्यांसह गटारी तसेच पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य देण्याची ग्वाही दिली.
यांचा प्रचार रॅलीत सहभाग
या प्रचार रॅलीत तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य राजेंद्र साहेबराव चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चौधरी, सुनील महाजन, ज्ञानदेव झोपे, कठोरा येथील सरपंच प्रशांत पाटील, शेतकी संघाचे संचालक प्रशांत निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोपान भारंबे, खडका येथील सरपंच संजय पाटील, भैय्या महाजन, दीपक भिरूड, चुडामण भोळे, वरणगाव येथील नगरसेवक गणेश धनगर, साकरी येथील मनोहर सपकाळे, किन्ही येथील ए.टी.चौधरी, पंचायत समिती उपसभापती वंदना सदानंद उन्हाळे, भालचंद पाटील, उल्हास बोरोले, गुरुजितसिंग चाहेल, राजू साबळे, फुलगाव येथील सरपंच वैशाली टेकोडे, उपसरपंच राजेंद्र चौधरी, ललित भोळे, नारायण जांभळे, तपतकठोरा येथील सरपंच उज्वला रामा कोळी, जितु कोळी, सोमा कोळी, सुनील कोळी, भोजराज पाटील, पितांबर पाटील, रामराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र कोळी, संतोष कोळी, किरण कोळी, देवा कोळी, राजेंद्र तायडे, अतुल पाटील, टाकळी येथील सरपंच प्रमोद चौधरी, उपसरपंच किशोर तायडे, मनोहर महाजन, प्रमोद पाटील, विनोद पाटील, महेश पाटील, काहुरखेडा येथील सरपंच दिलीप वराडे, नंदू वराडे, यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे या प्रचार रॅलीमध्ये तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
आमदारांचे ठिकठिकाणी औक्षण
आमदार संजय सावकारे यांचे ठिकठिकाणी सौभाग्यवतींनी औक्षण करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. आमदार सावकारे यांनीही गावा-गावातील हनुमान मंदिर, श्रीराम मंदिर यासह विविध मंदिरात जाऊन देवादिकांचे दर्शन घेतले.
